हर्निया म्हणजे काय?
हर्निया म्हणजे पोटातील नैसर्गिक छिद्रातून अनैसर्गिकरीत्या
डोकावणारे अवयव असतात. पोटातील ही नैसर्गिक छिद्रे म्हणजे जांघेत २
असतात , बेंबीच्या ठिकाणी १ अशी असतात. त्याचबरोबर मांडीमध्ये १
छिद्र नैसर्गिकरीत्या असते. या छिद्रातून पोटातील महत्वाचे अवयव
जात असतात. पोटातील दाब वाढल्यामुळे या छीद्रांवर ताण पडतो आणि ती
आकाराने मोठी होतात. अशा आकाराने वाढलेल्या छिद्रातून
गुरुत्वाकर्षनाने पोटातील आतडी व इतर अवयव त्या मोठ्या झालेल्या
छिद्रातून डोकावू लागतात. याच परिस्थितीला हर्निया असे संबोधले
जाते.

कधी कधी हर्निया हा पोटावर इतर शस्त्रक्रियेमुळे तयार झालेल्या छिद्रातून देखील होवू शकतो . त्याला शस्त्रक्रियेमुळे होणारा हर्निया असे म्हणतात .हर्निया ही मानवाला मिळालेली नैसर्गिक गोष्ट आहे. मनुष्य हा उभा राहू शकतो , त्यामुळे शरीरात काही नाजूक भाग तयार होतात. शरीरातील काही भाग जसे कि जांघ, बेंबी, मांडीचा जोड हे नाजूक असतात. सततचे उभे राहणे यामुळे गुरुत्वाकर्षण वाढते. त्याचा दाब या नाजूक जागी पडल्यामुळे देखील हर्निया होतो असे लक्षात आले आहे
हर्नियाची लक्षणे
1.जांघेत,बेंबीत,मांडीत
अचानक वेदना होणे व तेथे फुगवटा आल्यासारखे दिसणे
2.फुगवटा हा कायम राहणे अथवा वारंवार नाहीसा होणे.
3.फुगवटा हा आडवे पडल्यानंतर परत नाहीसा होणे.
4.खोकल्यावर अथवा कुन्थल्यावर फुगवटा आकाराने वाढणे
5जांघेत,बेंबीत,मांडीत सतत ओढल्यासारखे वाटणे .
हर्निया होण्याची कारणे
|
तंबाखू सेवन |
धूम्रपान |
|
मद्यपान |
वजन उचलणे |
|
शौचाला कुंथने |
लघवीसाठी कुन्थने |
|
जोरात
खोकणे |
जोरात शिंकणे |
|
सततचा
खोकला |
बद्धकोष्ठ |
|
अति
शारीरिक श्रम |
स्नायूंचा नाजुकपणा |
|
स्नायूंचे आजार |
मुळव्याधी |
|
पोटावरील शस्त्रक्रिया |
प्रोस्टेट ग्रंथींची वाढ |
|
जलोदर |
पोट फुगी |